उंदीर मंत्रालयात नाही विरोधकांच्या डोक्यात
मुंबई : उंदीर मंत्रालयात नाही विरोधकांच्या डोक्यात आहे अशी टिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीकेसीतील भाजपच्या महामेळाव्यात केली.मात्र सरकारवर उंदीर घोटाळ्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे त्यांच्याच बाजूला बसले होते हे विशेष.
काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा आहे. काँग्रेस म्हणजे कौरव सेना असून, कौरव सेना एकत्र येत आहे अशी टीका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. उंदीर मंत्रालयात नसून यांच्या डोक्यात आहे असेही ते म्हणाले. खडसे यांनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करीत भाजपले अडचणीत आणले होते. खडसे हे मुनगंटीवार यांच्याच बाजूला बसले होते हे विशेष.