राज्यात कायदा व सुव्यवस्थाच राहिली नसल्याची मंत्र्यांची टिका

राज्यात कायदा व सुव्यवस्थाच राहिली नसल्याची मंत्र्यांची टिका

अहमदनगर : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थाच नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे पर्यावरमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अहमदनगरला भेट दिली. त्यावेळी कदम यांनी काॅग्रेस , राष्ट्रवादी आणि भाजपवर टिका केली.

अहमदनगर येथिल पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन शिवसेनेला शह दिला. काल झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येमागे याच पक्षाचा हात असून, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. भाजप एकीकडे युती पाहिजे असे सांगत आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालत आहे हे भाजपाचे जुने धंदे आहेत, अशी टीकाही कदम यांनी केली.

केडगाव येथे काल शिवसेनेच्या संजय कोतकर, आणि वसंत ठुबे या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज रविवारी अहमदनगर बंद ठेवण्यात आले आहे. तर केडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पर्यावरणमंत्री रामदाम कदम यांनी आज या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर टीका केली. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली. पोलिसांच्या संगनमतानेच ही घटना घडली असून ,या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Previous articleहल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले दुष्काळी माणमध्ये श्रमदान
Next articleरामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here