पिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय
मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय निर्माण करण्याचा महत्त्वाच्या निर्णय घेण्यात आला असून,त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबरोबरच नवीन २ हजार ६३३ पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे
१) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता. नवीन २ हजार ६३३ पदे निर्माण करणार.
२) वैजापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचन सुविधा देण्यासाठी श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास मान्यता.
३ ) कटघोरा-डोंगरगड रेल्वे मार्ग उभारण्यासाठी छत्तीसगड रेल कार्पोरेशन लिमिटेड आणि साऊथ-ईस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड यांच्यासोबत एसपीव्हीमधील महानिर्मिती कंपनीच्या भागीदारीस मान्यता.
४ ) ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्यास मान्यता.
५ ) हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम-१९५२ मध्ये सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्यास मान्यता.