शिवाजी कर्डीलेंची भाजपातुन हकालपट्टी करण्याची शिवसेनेची मागणी

शिवाजी कर्डीलेंची भाजपातुन हकालपट्टी करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई :  अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथिल दोन शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरच्या घटनेचे पडसाद उमटले ,मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी शिवसेनेचे विधिमंडळ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसैनिकांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी अहमदनगरची निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढवली . एकीकडे युतीसाठी हात पुढे करायचा तर दुसरीकडे अश्या प्रकारे सेनेला संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला.निवडणुकीत शिवसेनेची मते घ्यायची आणि दुसरीकडे सेनेचे खच्चीकरण करायचे अशी भूमिका भाजपाची आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र ही सोडले .पोलीस अधीक्षकांचे कार्यालय फोडल्याप्रकारानी आत्तापर्यंत फक्त 20 जणांना अटक करण्यात आली आहे . प्रत्यक्षात या प्रकरणात 500 पेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याची माहिती आहे . पोलीस या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कदम यांनी केला . अहमदनगर हत्येप्रकरणाच्या निषेधार्थ ज्या शिवसैनिकांनी रास्ता रोको केला त्याच शिवसैनिकांवर पोलीस कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले गेले ,अशी माहितीही कदम यांनी दिली .

Previous articleपिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय 
Next articleभाजपचा ‘इतिहास’ शून्य असल्यामुळेच नागरिकशास्त्रात जाहिरातबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here