शिवसैनिक वर्षा बंगल्यावर अटक करवून घेणार !

शिवसैनिक वर्षा बंगल्यावर अटक करवून घेणार !

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे ७ एप्रिल रोजी संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ अहमदनगर येथिल शिवसैनिक परवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जावून स्वतःला अटक करवून घेणार आहेत.येत्या २५ एप्रिलला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे केडगावला जावून कोतकर व ठुबे या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा, तालुका पदाधिका-यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. केडगाव येथे घडलेल्या हत्याकांडाची आणि नंतर घडलेल्या परिस्थितीची माहिती सांगितली. येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जावून शिवसैनिक स्वतःला अटक करवून घेणार आहेत.

केडगाव येथे ७ एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक केली होती. याप्रकरणी ६०० जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केडगावला भेट दिली होती. हत्या झालेल्या या दोन शिवसैनिकांचा दशक्रिया विधी उद्या सोमवारी केडगाव येथे होणार असून, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दशक्रिया विधी नंतर शिवसैनिक मुंबईला येणार आहेत. त्यानंतर मंगळवारी वर्षा बंगल्यावर स्वतःला अटक करवून घेतील. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे २५ एप्रिलला केडगावला भेट देणार आहेत.

Previous articleराज ठाकरे आजच्या सभेत कोणाचा समाचार घेणार !
Next articleनाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here