पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदेंची अखेर बदली
मुंबई : राज्य सरकारने आज तब्बल २५ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव पारित करून सरकारकडे पाठविला होता मात्र हा प्रस्ताव गेल्याच आठवड्यात फेटाळण्यात आला असतानाही शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज तब्बल २५ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नियुक्ती पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून केली आहे.जालनाचे जिल्हाधिकारी एस.आर.जोंधळे यांची नियुक्ती मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॅा.ए.एम महाजन यांची नियुक्ती उप सचिव तथा प्रकल्प संचालाक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे.बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॅा.सी.एल.पुलकुंडवार यांची नियुक्ती सह.व्यवस्थापकिय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे तर महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर च्या व्यवसाथापकिय संचालक डॅा.निरूपमा डांगे यांची नियुक्ती बुलडाणाच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारी तर वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अदमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डहाणूच्या प्रकल्प अधिकारी आंचल गोयल यांची रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी , ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तर एस,एल माळी यांची नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त आदिवासी आयुक्त नागपूर माधवी खोडे चावरे यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त म्हणून,अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममुर्ती यांची खनिज व खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय जाधव यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे आयुक्त बिपीन शर्मा यांची मेढाचे महाव्यवस्थापकिय संचालक, रूचेश जयवंशी यांची पुण्यात अपंग विभागाचे आयुक्त, ओरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. अरदद यांची अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त,तर या महानगरपालिकेचे आयुक्त जी.सी मांगले यांची महानंदचे व्यवस्थापकिय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पवनित कौर यांची यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तर एच. मोडक यांची आदिवासी विभाग नागपूरचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.