मुख्यमंत्री गुजरातच्या दबावाखाली काम करत आहेत का

मुख्यमंत्री गुजरातच्या दबावाखाली काम करत आहेत का

सुनिल  तटकरेचा सवाल

मुंबई :  मुख्यमंत्र्याचे गुजरातवर विशेष प्रेम असल्याने राज्याच्या खर्चातून बुलेट ट्रेन, सुरत येथे मुंबईतील हिरा बाजाराचे स्थलांतर, उत्तर महाराष्ट्तील पाणी चोरून नेले जात असताना त्यावर मौन, मुंबईतील जागतिक आर्थिक केंद्राचे अहमदाबादला स्थलांतर आणि आता नाणार प्रकल्प देखील गुजरातला देण्याची भिती ते घालत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टिकास्त्र सोडले आहे.

कोकणी जनतेच्या भावना विचारात घेवून राष्ट्रवादी पक्षाचा नाणार प्रकल्पाला विरोध राहणार असल्याचे तटकरे म्हणाले. मुख्यमंत्री गुजरातच्या दबावाखाली काम करत आहेत का असा सवालही त्यानी केला. नगर मधील हत्याकांड प्रकरणी संग्राम जगताप याना गोवण्यात आल्याची आपली माहिती असून राज्य सरकारने या प्रकरणी आवश्यक तर तपास करणा-या कोणत्याही यंत्रणा कामाकला लावाव्या आणि जलद गती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी त्यानी केली. विधान परिषदेच्या आगामी महिन्यात होणा-या निवडणूकात कॉंग्रस सोबत आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा पार पडली असून येत्या पंधरा दिवसांत पुन्हा चर्चा करून अंतिम निर्णय दिल्लीच्या पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती त्यानी दिली.

हल्लाबोल यात्रेच्या पश्चिम महाराष्ट्रातील तिस-या टप्प्यात देखील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे सांगून ते म्हणाले की, येतया ६-७ तारखेला पालघर ११ ते १३ तारखे दरम्यान ठाणे जिल्हाआणि १ ते ६ जून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हल्लाबोल यात्रा जाणार आहे त्या नंतर १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाईल अशी माहिती त्यानी दिली. हल्लाबोल यात्रेची मागणीपत्रे त्या त्या विभागीय आयुक्तांना देण्यात आली मात्र ती सरकार पर्यंत पोहचत नसतील तर सरकारचा आपल्या अधिका-यांशी संवाद नसल्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याचे त्यानी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्या टिकेला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले की नाणार प्रकल्पाबाबत शरद पवार यांनी हा प्रकल्प राज्यात होणा-या गुंतवणूकीच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी प्रदुषणाच्या दृष्टीने नाणार येथे प्रकल्प करण्यास स्थानिकांचा विरोध असल्यास पक्ष त्यांच्या सोबत असल्याचे त्यानी देखील स्पष्ट केले आहे असे तटकरे म्हणाले.

Previous articleयुती आमची मजबूरी नाही
Next articleप्लास्टिक बंदी : उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here