खडसे आणि इनामदार यांची नार्को चाचणी करा

खडसे आणि इनामदार यांची नार्को चाचणी करा

दमानिया यांचे मुख्यमंत्र्याना पत्र.

मुंबई  : सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेवून सामाजिक कार्यकत्या कल्पना इमानदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नार्को चाचण्या करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत दमानिया यानी इनामदार यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आणि नाशिक मध्ये खडसे यांची लाचलुचपत विभागाने चौकशी केल्यानंतर इनामदार यानी आपल्या विरोधात आरोप केल्याचे सांगून त्यांचा बोलविता धनी कोण आहे असा सवाल केला आहे. खडसे यांनी आपण त्यांच्या विरोधात आरोप केल्यानतर धमकावण्याचे आणि खोट्या खटल्यात अडकविन्याचे प्रयत्न केल्याचे तसेच व्दयर्थी विधाने करून महिका म्हणून बदनाम करण्याचे प्रयत्न केल्याचेही दमानिया यानी मुख्यमंत्री याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Previous articleचार सनदी आधिका-यांच्या बदल्या
Next articleसंभाजी भिडेंच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी कबीर कला मंच च्या कार्यकर्त्यांवर छापे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here