संभाजी भिडेंच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी कबीर कला मंच च्या कार्यकर्त्यांवर छापे

संभाजी भिडेंच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी कबीर कला मंच च्या कार्यकर्त्यांवर छापे

प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप.

मुंबई  : कोरेगाव-भीमा दंगलीचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची अटक टाळण्यासाठी पोलिसांनी धाडसत्राची कारवाई केली आहे. आमच्याकडे असलेले भिडे यांच्या विरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

ही कारवाई करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कृष्णा नामक व्यक्ती पोलिसांच्या सोबत होती. त्यामुळे ही कारवाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकेतानुसार होते आहे की काय, अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.पुण्यातील एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पुणे पोलिसांनी धाडसत्र सुरू केले होते. या अंतर्गत पुणे, मुंबई आणि नागपुरातही धाड टाकण्यात आली. नागपुरातील ज्येष्ठ वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या बुद्धनगर येथील घरावर मंगळवारी पहाटे पुणे पोलिसांनी धाड टाकली. मात्र, ही कारवाई केंद्रीय पातळीवर आहे. यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Previous articleखडसे आणि इनामदार यांची नार्को चाचणी करा
Next articleमुंबईतील भाडेकरूना पाचशे फूटांचे घर द्या