मानवत आत्महत्या प्रकरणी तहसीलदारांसह संबंधितांना निलंबित करा

मानवत आत्महत्या प्रकरणी तहसीलदारांसह संबंधितांना निलंबित करा

धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई :  परभणी जिल्ह्यातील मानवत तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न ही अतिशय गंभीर घटना असून, याप्रकरणी मानवतच्या तहसीलदारांसह सर्व संबंधितांवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मानवत तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एक जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे.मानवत तालुक्यातील मानोली येथील चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केले. ही घटना गुरुवारी ता(१९)सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास घडली.  मानोली येथील १५ शेतक-यांनी १० एप्रिल रोजी तहसीलदाराना निवेदन दिले होते. यात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी,गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,गावातील २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.या समस्या न सोडविल्यास १९ फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता त्यानुसार आज सकाळी ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत  लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यापैकी चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हालवण्यात आल्याचे समजते.

या घटनेबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मानवत तालुक्यातील 5 शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अतिशय गंभीर आहे. पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाला कळवूनही त्यावर काहीच कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. प्रशासन किती ढिम्मपणे काम करते, किती गेंड्याच्या कातडीचे आहे हे या घटनेवरून लक्षात येते. उद्योगपती आणि बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना मात्र केराची टोपली दाखवत आहे. या घटनेची चौकशी करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदार आणि सर्व संबंधितांवर निलंबनाची तातडीने कारवाई केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे

Previous articleगृहराज्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने वाचले सामान्यांचे प्राण.!
Next articleमुंडे बहिण भाऊ आज पुन्हा एकत्रित !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here