लाळ्या-खुरकत लस निविदा चौकशीसाठी मुकेश खुल्लर समिती गठीत

लाळ्या-खुरकत लस निविदा चौकशीसाठी मुकेश खुल्लर समिती गठीत

मुंबई : राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरची लस उशीरा खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती ५ मे पर्यंत या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नसल्याचा  खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला अर्थसंकल्पिय अधिवेशनात केला होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना फैलावर धरत निविदाप्रक्रियेत घोळ घालून लस खरेदीला उशीर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिवेशन संपण्याच्या आत चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले होते.

२०१७ मध्ये या लशीच्या खरेदीसाठी तब्बल चार वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. चौथ्यांदा काढलेल्या निविदेत इंडियन इम्युनॉलॉजी प्रथम पात्र ठरल्यानंतर त्यांना काम देण्याचे निश्चित करण्यात आले मात्र त्यांनी अन्य राज्यात महाराष्ट्रापेक्षा कमी किमतीला निविदा भरल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाचव्यांना निविदा काढण्यात आली. या निविदेत बॉयोवेट कंपनीला काम देण्याचे ठरले होते. मात्र बॉयोवेट कंपनीने हरयाणाला ज्या दरात लस विकली त्यापेक्षा जास्त दराने महाराष्ट्राला लस विकणार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. विधानपरिषदेत लक्षवेधीवर यासंदर्भात सखेल चौकशी करण्याचे आश्वासन पदुममंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. त्यानुसार याची चौकशी करण्यासाठी आज अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती ५ मे २०१८ पर्यंत या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

Previous articleप्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल
Next articleपरळीकरांनो साथ आणि आशिर्वाद द्या; परिवर्तन घडवुन दाखवतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here