बॅनर,जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला योगदान द्या

बॅनर,जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला योगदान द्या

ना. पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक जाणिवेतून केले जनतेला आवाहन

बीड : माझे मोठे बॅनर लावून शहर सजवू नये तसेच जाहिरातवरही खर्च करू नये. करायचचं असेल तर पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास योगदान द्यावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असल्याने त्याच्या झळा ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहेत. बहुतांश भागात पाणी टंचाईने जनता हैरान झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्यासाठी काम झाले पाहिजे, पाणी फाऊंडेशन त्यासाठी जोमाने कामाला लागले आहे. लोक त्यांच्या श्रमदानात स्वतःहून सहभागी होत आहेत. आपल्या कार्यकाळात जसा जलयुक्त शिवार योजनेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि ती योजना यशस्वी झाली होती. अगदी तसाच सहभाग पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात देण्याची गरज आहे.

एखाद्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेलही, पण तो पुरस्कार शेवटचा आहे, असे समजून लोक जल्लोष करतात, मोठ मोठे बॅनर लावून शहर सजवतात, जाहिरातवरही मोठा खर्च करतात पण हया सगळ्यावर खर्च करण्याऐवजी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात योगदान दिले तर ते सर्वाच्याच हिताचे ठरेल त्यासाठी सर्वानी एकजुटीने मदत करावी असे आवाहन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

Previous articleपरळीकरांनो साथ आणि आशिर्वाद द्या; परिवर्तन घडवुन दाखवतो
Next articleविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here