राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दर तीन वर्षाने पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला लोकशाही मुल्याप्रमाणे सुरुवात होत असून आज राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा जाणता राजा अशी ओळख असलेले देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्याच अनुषंगाने शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. ३० एप्रिल रोजी मतमोजणी होवून अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.

दरम्यान पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही निवड होणार असून २९ एप्रिलला निवडणूकीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीतच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार आहे.अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, नगरसेवक राखी जाधव, सईदा खान, माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार मिलिंद कांबळे उपस्थित होते.

Previous articleमुख्यमंत्र्यांवरील पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन
Next articleकशेडी घाटातील बोगद्याचे काम दोन वर्षात पूर्ण करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here