महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला केंद्राचा पुरस्कार जाहीर
माझ्या बॅनर, हार,तुरे यावर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला योगदान द्यावे
ग्रामनिकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक जाणिवेतून केले जनतेला आवाहन
बीड : राज्यातील ग्रामपंचायती ना सशक्त करून पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला जाहीर झाला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे पुरस्कार स्विकारण्यासाठी जबलपूरला जाणार आहेत.
ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या विभागातंर्गत ग्रामपंचायतीला सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा या विभागाने उत्कृष्ट वापर करून शासनाच्या विविध योजना ग्रामीण लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविल्या आहेत. त्यांच्या याच कामाचा गौरव केंद्र सरकारने केला असून ग्रामविकास विभागाला पुरस्कार जाहीर केला आहे.
माझ्या बॅनर, हार, तुरे यावर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला योगदान द्या
ना.पंकजाताई मुंडे
बीड जिल्हा प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत देशात नुकताच पहिला आला,तसेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार मिळाला.अभिमान वाटला आपल्या जिल्ह्याची ओळख बदलली . पण हे सर्वांचे श्रेय आहे विभागाचे अधिकारी कार्यकर्त्यांचे…यासाठी माझे मोठे बॅनर लावून शहर सजवू नये तसेच वायफळ हार तुरे यात खर्च करू नये. करायचचं असेल तर पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास योगदान द्यावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असल्याने त्याच्या झळा ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहेत. बहुतांश भागात पाणी टंचाईने जनता हैरान होऊ नये यासाठी जलसंधारण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पाण्यासाठी काम झाले पाहिजे, पाणी फाऊंडेशन त्यासाठी जोमाने कामाला लागले आहे. लोक त्यांच्या श्रमदानात स्वतःहून सहभागी होत आहेत. आपल्या कार्यकाळात जसा जलयुक्त शिवार योजनेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि ती योजना यशस्वी झाली होती. अगदी तसाच सहभाग पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात देण्याची गरज आहे.एखाद्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेलही, पण तो पुरस्कार जणु शेवटचा आहे, असे समजून लोक जल्लोष करतात, मोठ मोठे बॅनर लावून शहर सजवतात, जाहिरातवरही मोठा खर्च करतात पण हया सगळ्यावर खर्च करण्याऐवजी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात योगदान दिले तर ते सर्वाच्याच हिताचे ठरेल त्यासाठी सर्वानी एकजुटीने मदत करावी असे आवाहन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.