उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

मुंबई : अहमदनगर मधिल केडगाव मध्ये आणि शहापूरमध्ये झालेल्या शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर आता काही वेळेपूर्वीच मालाडमध्ये शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. सचिन सावंत यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. कुरारच्या गोकूळनगर परिसरात ही घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव आणि शहापूर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली असून सचिन सावंत असे या  उपशाखाप्रमुखाचे नाव आहे. रविवारी रात्री संध्याकाळी मोटरसायकलवर आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर सावंत यांना महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

Previous articleएका तासात शरद पवारांनी जमा केला पाच कोटींचा निधी
Next articleदोन मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शेतक-याची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here