चंद्रकात पाटील एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवाच !

चंद्रकात पाटील एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवाच !

शरद पवार यांचे आव्हान

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदार संघातुन विधानपरिषदेवर गेलेले आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री हे राज्याचे धोरणात्मक निर्णय घेत असतात मात्र सध्या हे निर्णय कोल्हापूरमधून होतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. कधी नव्हे ती संधी मिळाली की माणूस हापापतो असे सांगत चंद्रकात पाटील याःच्या कार्यपध्दतीवर पवार यांनी हल्लाबोल केला.पवार एवढ्यावरच न थांबता चंद्रकांत पाटलांनी एकदा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवावीच असे आव्हान पवार यांनी पाटलांना दिले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभेतील आमदार नाहीत. गेली तीन टर्म ते पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून येता मात्र  केंद्रात मोदी सरकार आले आणि चंद्रकांत पाटलांचे नशीबचे उजाडले. भाजपाध्यक्ष अमित शहा व चंद्रकांत पाटील यांची दोस्ती जुनी आहे. चंद्रकांत पाटील भाजयुमोचे प्रमुख होते त्याच वेळी अमित शहा गुजरातचे प्रमुख होते. अमित शहांचा जन्म मुंबईत झाला तर त्यांची सासरवाडी कोल्हापूरातील आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जवळिक असल्यामुळे अमित शहा अध्यक्ष होताच चंद्रकांत पाटील यांचे भाजपमध्ये असलेले वजन भलतेच वाढले असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

Previous articleशेतकऱ्यावर पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी
Next articleमाध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here