एस.टी. कामगारांची वेतनवाढ निवडणूक आचारसंहीतेच्या कचाट्यात

एस.टी. कामगारांची वेतनवाढ निवडणूक आचारसंहीतेच्या कचाट्यात

कामगारांना काही काळ करावी लागणारी प्रतीक्षा

मुंबई : एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीच्या संदर्भात, १ मे रोजी घोषणा करणार असे जाहिर करण्यात आले होते. त्यावेळी कोणत्याही निवडणूका जाहिर झाल्या नव्हत्या. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, पालघर लोकसभा व पलुस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूका करिता २ जून अखेर आदर्श आचारसंहीता जाहिर केली आहे. सदर आचारसंहीता महाराष्ट्रातील ३५ पैकी २८ जिल्ह्यांना लागू झाली आहे. या काळात कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यास प्रतिबंध असतो.त्यामुळे उद्या कामगार दिनाचे औचित्य साधून एस.टी. कामगारांची वेतनवाढ घोषणा निवडणूक आचारसंहीतेच्या कचाट्यात सापडली आहे.

प्राप्त परिस्थिती लक्षात घेता, कामगारांना दिलेले वचन पाळण्याची तीव्र इच्छा असताना देखील निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे कामगारांच्या वेतनवाढी बाबत काही काळ थांबणे भाग पडते आहे. असे असले तरी एस.टी. प्रशासनाने तातडीने निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करुन प्रलंबित वेतनवाढ जाहिर करणेबाबत विनंती केली आहे. निवडणूक आयोगाची मंजूरी मिळाली, तसेच मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्नाटकच्या निवडणूकीमध्ये १५ मे, २०१८ पर्यंत निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त आहेत, ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये वेतन वाढी संदर्भात शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्यात येईल.

प्राप्त परिस्थितीमध्ये कामगारांना आवाहन करण्यात येते की, आपण वेतन वाढीसाठी १ मे पर्यंत केलेली प्रतीक्षा नाईलाजाने काही काळ वाढवावी लागणार आहे. तरी कामगारांनी वेतन वाढी संदर्भात निश्चिंत रहावे, असे आवाहन एस.टी. महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Previous articleइंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि युती सरकार एकाच माळेचे मणी!
Next articleमराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीची आई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here