खोटे आरोप करणारे तोंडघशी पडले

खोटे आरोप करणारे तोंडघशी पडले

एकनाथ खडसे

खडसेंना एसीबीकडून क्लीन चीट

मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.भोसरी येथिल जमीन खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळाली असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसेंवरील आरोप सिध्द न झाल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.या महत्वपूर्ण निर्णयामुळे खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन वर्ष सुरू असलेल्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले असून,या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. या निर्णयामुळे खोटे आरोप करणारे तोंडघशी पडले,अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.खडसे यांना भोसरी येथिल जमीन खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांच्या वरील आरोप सिध्द न झाल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन वर्ष माझ्यासह माझ्या कुटुंबाला अस्वस्थ करणारी गेली. माझ्या हातुन कोणतीही चूक झालेली नव्हती. त्यामुळे मी निर्दोष सुटणार असा विश्वास होता. माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझ्या राजीनाम्याची मागणी कोणत्याही राजकीय पक्षाने केली नव्हती तर; सुपारी बहाद्दर आणि कथित समाजसेवकांनी केली होती असेही खडसे म्हणाले. माझ्यावर आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३ कोटी ७५ लाखाला खरेदी केली होती.जमिनीची किंमत ३१ कोटी ११ लाख रुपये असताना ती केवळ तीन कोटींना खरेदी करण्यात आली असा आरोप करण्यात आला होता.या जमिन खरेदी प्रकरणी खडसेंची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही या जमिन खरेदी प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. या अहवालात खडसेंवरील आरोप सिध्द न झाल्याचा आणि या खरेदी प्रक्रियेत शासनाचे नुकसान झालेले नाही, असा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारच्या दबावामुळेच खडसेंना क्लीन चीट

अंजली दमानिया

राज्य सरकारच्या दबावामुळेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून क्लीन चीट देण्यात आली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खडसे यांना मिळालेली क्लीन चिट म्हणजे भाजपा आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना कसे पाठिशी घालते याचे उत्तम उदाहरण आहे असेही त्या म्हणाल्या. पुण्यातील भोसरी येथिल जमीन गैरव्यवहारप्रकरणाचे पुरावे हे गेल्या वर्षी दिले होते. परंतु सरकारच्या दबावामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीन चिट दिली असे दमानिया यांनी सांगितले.

Previous articleमराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीची आई
Next articleअशोक चव्हाण उद्या नाणारच्या स्थानिकांशी संवाद साधणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here