माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीतांचा भाजपात प्रवेश

माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीतांचा भाजपात प्रवेश

पालघर मधून उमेदवारी

मुंबई :  भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी करण्यासाठी पालघर मधिल कॅांग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना भाजपात प्रवेश देत पालघरच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे.

पालघर मधिल कॅांग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री म्हमाले की, अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर वनगा यांच्या कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत विचार होता तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे दुर्देवी आहे असे सांगतानाच शिवसेनेने असे वागायला नको होते असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. श्रीनिवास वनगा यांचा प्रवेश करून घेणे, त्यांना अज्ञातस्थळी ठेवणे हे दुर्देवीच अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पालघरची जागा भाजपची आहे ती भाजपने जिंकली आहे त्यामुळे या ठिकाणी पालघरचे नेते राजेंद्र गावीत यांना भाजपात प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आल्याचे मुक्यमंत्र्यांनी सांगितले.

राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी संदर्भात संसदिय निवड मंडळाला शिफारस करण्यात आली असून, त्यांच्या नावाची घोषणा आज होवू शकते असे सांगतानाच गावीत यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी १० मे रोजी भरणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा द्यायला हवा होता असे दानवे म्हणाले मतदार आणि कार्यकर्ते हे भाजपसोबत असल्याने आम्हाला यश मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

Previous articleवनगा ऐवजी सावरांचे निधन झाल्याचा दानवेंकडून उल्लेख
Next articleस्वार्थापोटी राजेंद्र गावीतांचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here