आ.पंकज भुजबळ “मातोश्रीवर”

आ.पंकज भुजबळ “मातोश्रीवर”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज भुजबळ हे मातोश्रीवर दाखल झाले असून,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भुजबळांची बाजू घेण्यात आल्यानंतर आ.पंकज भुजबळांच्या मातोश्री भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शिवसेनेत असताना भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले. भुजबळांना जामिन मिळाल्यानंतर सामनातून भुजबळांची बाजू घेण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थेट मातोश्री गाठल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Previous articleशरद पवार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत
Next articleविखेंनी घेतली भुजबळांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here