मुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित साजरा होणार राजधानी महोत्सव

मुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित साजरा होणार राजधानी महोत्सव

मुंबई : सातारा येथे मे महिन्यात होणारा राजधानी महोत्सव अत्यंत दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीने साजरा होणार हे आज स्पष्ट झाले. साता-याचे खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्विकारत कार्यक्रमाला येण्याबाबत दुजोरा दिला. त्याचप्रमाणे या महोत्सवाला छत्रपती घराण्याचा मनाचा शिवसन्मान पुरस्कार प्राप्त महानायक अमिताभ बच्चन तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

साता-याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा  शासकीय निवासस्थानी भेट घेतली,  मुख्यतः सातारा येथे होणाऱ्या राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार वर्षावर गेले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम स्विकारत, या निमित्ताने आपल्याला पुन्हा सातारा येथे यायला आवडेल असे उदगार काढले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी राजधानी महोत्सवाच्या भव्य आयोजनाबद्दल कौतुकही केले.

वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर अनेक विषयांवर चर्चा केली. २५ ते २७ मे दरम्यान राजधानी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, २७ मे रोजी सायंकाळी छत्रपती घराण्याकडून देण्यात येणाऱ्या शिव-सन्मान पुरस्कारासाठी मुख्यमंत्री आणि महानायक अमिताभ बच्चन सोबतच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Previous articleकाँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार
Next articleक्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव “रुसा”कडे पाठविणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here