“जो तुम्हारे दिल मे वो मेरे दिल में नही”

“जो तुम्हारे दिल मे वो मेरे दिल में नही”

मुंबई : साता-याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजधानी महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांचे तुफान आले असतानाच “तुम्हारे दिल मे वो मेरे दिल में नही”, असा शेर सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुढील राजकारणाची झलक दाखवल्याची चर्चा आहे.

आज दुपारी तब्बल दीड तास खा.उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली,यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.सध्या नेत्यांच्या पळवापळवीची मालिका सुरू असतानाच “कधी हा कधी ना” मध्ये असणारे खा.उदयनराजे भोसले भाजप मध्ये जाणार का हा प्रश्नही उपस्थित झाला, गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीशी त्यांची जवळीक वाढल्याने भाजप मध्ये येण्याचे निमंत्रण खा.भोसलेंनी स्विकारले नसल्याची चर्चा आहे मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष इशारा केला असता
“जो तुम्हारे दिल मे वो मेरे दिल में नही”, असे सांगत त्यांनी बिनधास्तपणाची झलकही दाखवली.

छत्रपती शिवाजी महाराज शाही घराण्याकडून देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार यावर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे, राजधानी महोत्सवात २७ मे रोजी अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केला जाणार अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. छत्रपतींच्या शाही परिवाराकडून दरवर्षी भारताचे नाव जगभर पसरवल्या जाणा-या अत्यंत मान्यवर व्यक्तीला शिव सन्मान पुरस्कार दिला जातो, यावर्षी हा मानाचा पुरस्कार बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सातारा जिल्ह्यातील देशपातळीवर कला, क्रीडा, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या १२ मान्यवरांचा गौरव भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, २५ ते २७ मे च्या दरम्यान राजधानी महोत्सव होत असून या तीन दिवसात अनेक कार्यक्रम होणार आहेत.देशपातळीवर होणाऱ्या विविध मोठ्या पुरसकरच्या तोडीचा राजधानी महोत्सव असेल.

Previous articleक्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव “रुसा”कडे पाठविणार
Next articleनोटाबंदी, मांसबंदीनंतर मोदीबाबा नसबंदीही करतील : धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here