पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही !

पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही !

एकनाथ खडसे

मुंबई: भोसरी येथिल एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लिन चिट दिलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे.

भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला. या निर्णयामुळे खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. भाजपमधून बाहेर पडण्याचा कुठलाही विचार नाही, भाजप मला माझ्या कुटुंबासारखा आहे. माझ्या कठीण वेळेत पक्षाने मला खूप मदत केली असेही खडसे यांनी म्हटले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला फक्त एक वर्ष बाकी असून, त्यापूर्वी काही स्थानिक निवडणुकाही होणार असल्याने आचारसंहितेत सरकारला फार विकासकामे करता येणार नाहीत, म्हणून मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नसल्याचे खडसे म्हणाले.

Previous articleबोंडअळीच्या नुकसान भरपाईचे श्रेय कसले घेता ; एका टप्यात मदत द्या
Next articleमोदी सरकारने जाहिरातीबाजीवर खर्च केले ४ हजार ३४३ कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here