कर्नाटकच्‍या राज्‍यपालांना तातडीने पदमुक्‍त करा! : विखे पाटील

कर्नाटकच्‍या राज्‍यपालांना तातडीने पदमुक्‍त करा! : विखे पाटील

मुंबई : कर्नाटकमध्‍ये भारतीय जनता पक्षाला घटनाबाह्य पध्‍दतीने झुकते माप दिल्‍याबद्दल तेथील राज्‍यपालांना तातडीने पदमुक्‍त केले पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्‍हटले आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्‍या प्रचारार्थ विखे पाटील आज डहाणू येथे आले असता पत्रकारांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देताना त्‍यांनी हे विधान केले. ते म्‍हणाले की गोवा, मेघालय, मणिपूर प्रमाणे राज्‍यपालांनी पुरेसे बहुमत असलेल्‍या काँग्रेस व जेडीएसच्‍या आघाडीला सत्‍तास्‍थापनेसाठी पाचारण करायला हवे होते. परंतू राज्‍यपालांनी भारतीय जनता पक्षाला निमंत्रीत केले. एवढेच नव्‍हे तर बहुमत सिध्‍द करण्‍यासाठी त्‍यांना तब्‍बल १५ दिवसांचा अवधी दिला. परंतू सर्वोच्‍च न्‍यायालयाने भाजपला शनिवारीच बहुमत सिध्‍द करण्‍याचे आदेश देवून एकप्रकारे सत्‍तेसाठी व्‍याकूळ झालेल्‍या मंडळींना सणसणीत चपराक लगावली आहे. काहीही झाले तरी शेवटी लोकशाहीचाच विजय होणार असून, कर्नाटकमध्‍ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचेच सरकार सत्‍तारुढ होईल,असा विश्‍वासही विरोधी पक्षनेत्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी हातात पाटी व खोरे घेवून केले श्रमदान
Next articleसर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here