नाणार रिफायनरी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा: शिवसेना

नाणार रिफायनरी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा: शिवसेना

मुंबई : नाणार रिफायनरीसाठी काढलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेवून तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना उद्योग सचिवांकडे केली होती. तसा प्रस्ताव करण्याची अनुमती मिळावी म्हणून सदर फाईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केली आहे.

तुतीकोरीनसारखी दुर्दैवी परिस्थिती नाणारमध्ये उदभवू नये म्हणून वेळीच उपाय करावा अशी शिवसेनेची भूमिका आहे. युती सरकारच्या कार्यकाळात अशी घटना घडू नये या भावनेतून नाणार प्रकल्पासाठी प्रसिध्द झालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते,पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा समावेश होता.

Previous articleमुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा : काॅग्रेस
Next articleकॅन्टोमेंटच्या विकासासाठी राज्याकडून खास निधी  : गिरीश बापट