मुंबई शिक्षक मतदार संघातुन अनिल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई शिक्षक मतदार संघातुन अनिल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई :  विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने ही निवडणूक शिवसेना, भाजपा पुरस्कृत उमेदवार आणि लोकतांत्रिक जनता दल यांच्यात होणार आहे. भाजपा पुरस्कृत मुंबई शिक्षक संघटना संयुक्त कृती समितीचे उमेदवार अनिल देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

येत्या २५ जून रोजी विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत असून, शिवसेनेने प्रा. शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार कपिल पाटील हे लोकतांत्रिक जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील. आज भाजपने मुंबई शिक्षक संघटना संयुक्त कृती समितीचे अनिल देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.अनिल देशमुख यांनी आज मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी कोकणभवन येथे आपला उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे सादर केला. याप्रसंगी शिक्षणमंत्री  विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, विनायक कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकोकण पदवीधर निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी
Next articleशिवशाही बसमध्ये दिव्यांगांना सवलत द्या : धनंजय मुंडे