महाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर : भुजबळ

महाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर : भुजबळ

पुणे: “महाराष्ट्र सदन सुंदर आणि छगन भुजबळ” अंदर अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खंत व्यक्त करून, मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

पुण्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बोलत होते. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्यानेच मी आज बाहेर येऊ शकलो. या पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त करतानाच,मी जामीनावर बाहेर आल्यावर मी पक्ष सोडणार अशा चर्चा होत्या परंतु मी पक्ष सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सदन सुंदर आणि छगन भुजबळ अंदर, अशी खंतही भुजबळांनी व्यक्त केली.

बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी, असा आत्मविश्वास भुजबळ यांनी व्यक्त करीत, सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेले असे सांगत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.इंदिरा गांधी यांची आणीबाणी घटनेवर आधारित होती, सध्याची आणीबाणी मात्र भीषण आहे. आत्महत्या गावात नव्हे, तर चक्क मंत्रालयासमोर होतात, केवढे अच्छे दिन आलेत.गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता असून, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला आहे. सर्व बेरोजगारांना नोकरी मिळाली, घराघरात स्वस्त गॅस दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार, असे सांगत त्यांनी भाजपा सरकारवर उपरोधिक टीका केली. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया, अशी शायरी करून भुजबळांनी मोदी सरकारवर टीका केली.

Previous articleते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु : धनंजय मुंडे
Next articleवंचितांशी नाळ जोडली गेल्यामुळेच मुंडे साहेब अद्वितीय लोकनेता झाले : पंकजा मुंडे