अडीच वर्षानंतर प्रथमच छगन भुजबळ व समीर भुजबळ नाशिक दौ-यावर
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खा.समीर भुजबळ हे गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर उद्या गुरूवारी १४ जून रोजी नाशिक शहरात दाखल होत आहे.यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
गेल्या अडीच वर्षाच्या कालवधीनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खा.समीर भुजबळ हे नाशिक जिल्ह्यात येत असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकार्त्यामध्ये चैत्यन्य संचारले आहे. उद्या आ.छगन भुजबळ व माजी खा. समीर भुजबळ यांचे इगतपुरी, वाडीवऱ्हे पाथर्डी फाटा सह शहरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक शहरात प्रवेश करताच प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी यांच्या पूर्णाकृतीपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यानंतर गणेशवाडी,पंचवटी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास वशालीमार येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेअभिवादन करणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास ते मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.