संजीव पेंढरकर क्वालिटी ब्रॅण्ड बिझनेस एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित

संजीव पेंढरकर क्वालिटी ब्रॅण्ड बिझनेस एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित

मुंबई : आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे जगप्रसिद्ध असलेल्या विको उद्योग समुहाचे संचालक संजीव पेंढरकर यांना नॅशनल चेंबर ऑफ कॅामर्स अॅण्ड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया यांच्याकडून प्रतिष्ठित क्वालिटी ब्रॅण्ड बिझनेस एक्सलेन्स पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

राष्ट्रीय पातळवरील प्रतिष्ठित पुरस्काराचा वितरणाचा भव्यदिव्य सोहळा नुकताच हॅाटेल कोहिनुर कॅाटिनेण्टल येथे पार पडला. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना विकोचे संचालक संजीव पेंढरकर म्हणाले की, दर्जेदार औषधिय वनस्पतींचा वापर करून विकोने आपल्या उत्पादन आणि गुणवत्तेबाबत एक वैश्विक मान्यता मिळवली आहे. विको व्यवस्थापन आणि उत्पादनांवर आपल्या निष्ठावंत ग्राहकांचा असलेला प्रचंड विश्वास आमच्याकरीता महत्वाचा असून, तो आम्हाला कायमच जपायचा आहे. तरूण उद्योजकांना उद्देशून संजीव पेंढरकर म्हणाले की, ग्राहक आस्थेने व स्वखुशीने आयुर्वेदिक उत्पादनांना स्वीकारीत आहेत. ज्यामुळे एफएमसीजीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या कार्यक्रमाला भारत सरकारचे मानव संसाधन संचालक अविनाश कुमार, अभिनेत्री माधवी निमकर असोचामच्या अध्यक्षा सुजाता देव शैक्षणिक तत्र अविनाश शर्मा, जयप्रकाश कर्नाटकी,किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर
Next articleकेंद्राचे मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष –धनंजय मुंडे