केंद्राचे मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष –धनंजय मुंडे

केंद्राचे मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष –धनंजय मुंडे

नागपूर :  मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

अंधेरीतील पादचारी गोखले पुल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या एकंदरीत कारभारावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे.

अंधेरी स्थानकाचा पादचारी पुल कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी मुंबईतून कोटयवधी रुपयांचा कर रुपात निधी मिळत असताना मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे का लक्ष दिले जात नाही असा सवाल सरकारला केला आहे.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे अपघातांच्या घटना वारंवार घडत असताना तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यापेक्षा एकदाच उपनगरीय रेल्वेचा सर्व्हे करुन कोणत्या मुलभित सुविधा अपेक्षित आहेत याचा आढावा घेवून तरतुद करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्य सरकार सध्या धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहे 

सध्याच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना इतकं हतबल व्हावे लागत आहे की,शेतकऱ्यांकडे शरीरसुखाची मागणी करण्याइतपत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असताना सरकार मात्र सध्या धृतराष्ट्राची भूमिका पार पाडत असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  मुंडे यांनी केली आहे.

पेरणीचा हंगाम सुरु झाला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही असल्याची बाब समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांच्या भल्याचा निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही.

पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी अधिकारी करु लागले आहेत इतकी हतबलता शेतकऱ्यांमध्ये आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना नक्कीच लाज आणणाऱ्या आहेत. हे सरकार सध्या धृतराष्ट्रासारखे आंधळे होवून बसले आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Previous articleसंजीव पेंढरकर क्वालिटी ब्रॅण्ड बिझनेस एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित
Next articleविरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार ?