राज्यातील सरकार अफवेबाज आणि बहिरे : विखे पाटील

राज्यातील सरकार अफवेबाज आणि बहिरे : विखे पाटील

चहापानावर बहिष्कार

नागपूर : धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि शिवस्मारकाबरोबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा करणा-या या सरकारने आता अशा अफवा पसरविण्याचा धंदा बंद करावा,सरकार केवळ अफवा पसरवत असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत जनता नाराज असल्याचा असा टोला लगावत मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सरकार बहि-याची भूमिका घेत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषद सांगितले.

शेतक-यांना दिलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या सुरूच आहेत त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याची सिद्ध झाल्याची टीका विखे पाटील करून सरसरकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. केली.राज्यातील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरण आम्ही उघड केली पण मुख्यमंत्र्याचे क्लिन चीट देण्याचे काम सुरूच असल्याचे सांगून काल काॅग्रेसने सिडको जमीनीचा उघड केलेला घोटाळा अधिवेशनात उपस्थित करून हा मुद्दा लावून धरणार असल्याचे विखे यांनी सांगितले.धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि शिवस्मारकाबरोबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा करणा-या या सरकारने आता अशा अफवा पसरविण्याचा धंदा बंद करावा असा टोला लगावत बहि-याची भूमिका घेणा-या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले.नाणार प्रकरणी विखे यांनी शिवसेनेवरही यावेळी टीकास्त्र सोडत या सर्व मुद्द्यावर उद्यापासून सुरू होणा-या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.

Previous articleनागपूर आमदार निवासात पीएचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Next articleसामाजिक बांधिलकीमुळेच बुलडाणा अर्बनची घोडदौड : नितीन गडकरी