शरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा यांना काॅग्रेसची उमेदवारी

शरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा यांना काॅग्रेसची उमेदवारी

माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट

मुंबई : विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना काॅग्रेसने उमेदवारी नाकारली असून,शरद रणपिसे यांना पुन्हा संधी देत वजाहत मिर्झा अतार या तरूण उमेदवाराला संधी दिली आहे.

येत्या १६ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे.काँग्रेसने या निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावांची आज घोषणा केली आहे. शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा अतार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मिर्झा अतार हे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत

उमेदवारांच्या नावांची घोषणा करतानाच काँग्रेसने विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे. माणिकराव ठाकरे यांच्यासह शरद रणपिसे आणि संजय दत्त हे काँग्रेसचे तीन आमदार निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे चार, भाजपचे दोन, शिवसेना आणि शेकापचा प्रत्येकी एक आमदार येत्या २७ जुलैला निवृत्त होत आहे.

Previous articleभाजप-शिवसेनेने मुंबईकरांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावाः खा. अशोक चव्हाण
Next articleराष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार