राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

नागपूर :  आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे आज दुपारी एक वाजता येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत.

येत्या १६ जुलै रोजी ११‍ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे.संख्याबळानुसार राष्ट्रवादीने एक तर राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर काॅग्रेसने दोन जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.काॅग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची काल घोषणा केली त्यानुसार शरद रणपिसे , वजाहत मिर्झा यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रवादीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.याप्रसंगी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते उपस्थित रहाणार आहेत.

भाजपाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नसला तरी शिवसेनेकडून विधानपरिषदेतील गटनेते अनिल परब आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Previous articleशरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा यांना काॅग्रेसची उमेदवारी
Next article..आणि विधानभवनात अवतरले…संभाजी भिडे