महादेव जानकर  विजय गिरकर यांना भाजपाची उमेदवारी

महादेव जानकर  विजय गिरकर यांना भाजपाची उमेदवारी

मुंबई :  येत्या १६ जुलै रोजी होणा-या विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपाने आज आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर तसेच माजी राज्यमंत्री विजय ऊर्फ भाई गिरकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.त्या शिवाय राम पाटील रातोळीकर, रमेश नारायण पाटील व निलय नाईक यांच्या नावची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

येत्या १६ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. भारतीय जनता पार्टीने आज पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपातर्फे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर तसेच माजी राज्यमंत्री विजय ऊर्फ भाई गिरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक यांना भाजपातर्फे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी आज उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

Previous articleमहाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपाची दमदार एन्ट्री
Next articleआ. प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर ठोकला ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा