विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांनी माफी मागावी : राम कदम

विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांनी माफी मागावी : राम कदम

नागपूर: सिडको जमीन व्यहार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार आणि बिनबुडाचे आरोप केल्या प्रकरणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे सदस्य राम कदम यांनी आज विधानसभेत केली.

सिडको जमीन व्यहार प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केल्या नंतर आक्रमक झालेले भाजपाचे सदस्य राम कदम यांनी बेजबाबदार आणि बिनबुडाचे आरोप केल्या प्रकरणी विरोधीपक्ष नेते आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली.कोणताही आधार नसताना चव्हाण यांनी आरोप केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी करतानाच अध्यक्षांनी यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी आ. कदम यांनी केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विखेंची मागणी
Next articleविधानपरिषदेची जागा न दिल्याने रिपाइं भाजपवर नाराज !