​​राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुर्ववत सुरु करा : आ. प्रवीण दरेकर  

​​राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुर्ववत सुरु करा : आ. प्रवीण दरेकर  

आ. प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सहकारातील विविध प्रश्नांवरही व्यापक बैठक घेण्याचा आग्रह

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

नागपूर  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा गेली चार ते पाच वर्षे बंद असलेला शिक्षण निधी पुर्ववत सुरु करावा, अशी मागणी भाजपा आमदार व राज्य सहकारी संघाचे तज्ञ संचालक प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.

नागपूर अधिवेशन दरम्यान, आज आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी बंद असल्याने कर्मचाऱयांना पगार मिळत नाही. तसेच सहकार शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्रमही ठप्प झाला असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षण निधी सुरु करण्याचे आश्वसन दिले. दरम्यान, सहकार ​क्षेत्रातील विविध महत्वपूर्ण प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मोडून ते सोडविण्यासाठी राज्यस्तरावरील एक व्यापक व विस्तृत बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्यता दिली.

यावेळी, महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार प्रवेश केल्याबद्दल आमदार दरेकर यांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रसाद लाड, आमदार अमोल महाडिक आदी उपस्थित होते.

Previous articleमंत्रालयाच्या तिस-या मजल्यावर महिलेची घोषणाबाजी
Next articleविधानभवन परिसरात पाणीच पाणी ; लाईट गेल्याने कामकाज थांबविले