विधानभवन परिसरात पाणीच पाणी ; लाईट गेल्याने कामकाज थांबविले

विधानभवन परिसरात पाणीच पाणी ; लाईट गेल्याने कामकाज थांबविले

नागपूर : नागपूरात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका आज विधानभवन परिसराला बसला. लाईट हाऊसमध्ये पाणी गेल्या सकाळी १० वाजता सुरू होणारे कामकाज लाईट अभावी घेण्यात आले नाही.

आज सकाळी १० वाजता विशेष बैठकीचे कामकाज होणार होते. मात्र सकाळपासूनच नागपूर आणि विधानभवन परिसरात तुफान पाऊस झाल्याने विधानभवन परिसरात पाणी साचून लाईट हाऊसमध्ये पाणी गेल्याने विशेष बैठकीचे कामकाज होवू शकले नाही.विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार यामुळे स्पष्ट झाला आहे. नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सध्या विधानभवन परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले आहे.तर विरोधकांनी पाय-यांवर आंदोलन करीत मोबाईल मधिल बॅटरी लावून याचा निषेध केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते मुंडे आणि इतर मंत्र्यांना कामकाज करीत असताना मोबाईल मधिल बॅटरीची मदत घ्यावी लागत आहे.

Previous article​​राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुर्ववत सुरु करा : आ. प्रवीण दरेकर  
Next articleराज्य सरकारने अक्षरश: लोकशाहीचे धिंडवडे काढलेय : अजित पवार