दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती करणार: शिक्षण मंत्री

दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती करणार: शिक्षण मंत्री

नागपूर : येत्या दोन महिन्यांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १८ हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. यामुळे शिक्षण संस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार आहे अशी माहिती शिक्षण व क्रीडा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

राज्यातील अर्धवट क्रीडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. ३० खेळाडूंना थेट शासनात नियुक्ती देण्यात आली असून ११ हजार ४६० खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

Previous articleविधानपरिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष; सभापतीपदावर दावा करणार ?
Next articleमुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाला निर्देश