….आमदारकी ओवाळून टाकील : नितेश राणे 

….आमदारकी ओवाळून टाकील : नितेश राणे 

नागपूर : नाणार येथिल प्रस्तावित वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प हा उध्वस्त करणारा प्रकल्प असून,तो रद्द करण्यासाठी कितीही टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे.माझ्या कोकणवासींयावरून शंभर आमदारकी ओवाळून टाकील, असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले.

कोकणी माणूस हा आमचा प्राण आहे. आज आम्ही जे आहोत, ते केवळ या माणसांच्या मुळे आहोत. त्याची परतफेड करणे हे माझे कर्तव्य असल्याने माझ्या कोकणवासींयावरून अशा शंभर आमदारकी ओवाळून टाकील, असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. राणे यांनी या प्रकरणी केलेल्या गोंधळावरून शिवसेनेवर प्रहार केला. शिवसेना सत्तेमध्ये राहून नाणारला विरोध करण्याची नौटंकी करीत असून ही स्थानिकांची फसवणूक आहे. प्लास्टीकवर बंदी आणताना हे सरकारमध्ये तर नाणार रद्द करताना विरोधात आहेत, हा दुटप्पीपणा आता कोकणातील जनतेला कळून चुकला आहे, असेही आ. नितेश राणे म्हणाले.

विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर आ. राणे यांनी आज नाणारच्या जनतेने नागपूरात काढलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला भेट दिली. तेव्हा नाणारवासीयांनी त्यांचे जोरदार घोषणा देत स्वागत केले. माझ्या कोकणी बांधवांसाठी कितीही टोकाचे पाऊल उचलावे लागले, तरी त्यासाठी राणे कुटूंब कधी मागे पाहणार नाही.तुम्ही आम्हाला जे प्रेम दिले आहे, त्याच्यापुढे आमदारकी काहीच नाही माझ्या कोकणी जनतेसाठी अशा हजारो आमदारकी ओवाळून टाकील, असे नितेश राणे म्हणताच प्रकल्पग्रस्तांनी जोरदार टाळ्यांचा गजर केला. आणि नितेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है,  कोण आला रे कोण आला, कोकणचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या.

Previous articleनाणारबाबत प्रामाणिक असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे
Next articleग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट बँक खात्यात : पंकजा मुंडे