मुंबई आणि उपनगरातील बंद स्थगित
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. मात्र दुपार नंतर मुंबई व उपनगरामध्ये पुकारण्यात आलेला बंद स्थगित करण्यात आला आहे.बंद यशस्वी केल्याबद्दल समन्वयकांनी मुंबईकर आणि व्यापा-यांचे दिलेल्या आभार मानले आहेत.
सकल मराठा समाजाने दुपारी दादर येथे पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. हा बंद दुपारी स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली आहे. समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाने आज बुधवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. शाळा, महाविद्यालये ,रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने ,स्कूल बस, दुधाचे टँकर,याअत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळले होते. कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिण्यात आल्या होत्या. सकाळी मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी उपनगरीय गाड्या अडविण्यात आल्या होत्या. सायन पनवेल महामार्ग अडविण्यात आल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले होते.










