काॅग्रेसचे आमदार भारत भालके यांचा राजीनामा
मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरून आमदारकीचा राजीनामा देण्याचा सिलसिला सुरूच असून,आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काॅग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आणि वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असतानाच आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला आहे.
पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मराठा ,धनगर , महादेव कोळी,व मुस्लिम समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळावे ही मागणी हा समाज करीत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी तोंडी आश्वासन देवूनही ठोस निर्णय घेतला नाही.सध्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे.अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्याची नैतिकता वाटत नाही असे अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात आ. भारत भालके यांनी नमूद केले आहे.