जनतेने विकासावर विश्वासाची मोहोर उमटवली – मुख्यमंत्री
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकासाचे राजकारण सुरू केले त्यावर जनतेने विश्वासाची मोहोर उमटवली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
जळगाव आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज आंदोलने होत असून त्यांच्या मागण्या देखील रास्त आहेत. हे सरकार त्या मागण्या प्रामाणिक पणे सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकासाचे राजकारण सुरू केले त्यावर जळगाव आणि सांगली, मिरज, कुपवाड येथिल जनतेने विश्वासाची मोहर उमटवली. आरक्षण रोजगार, विकाससाचे प्रश्न सोडवण्यासाठी या विजयामुळे अजून पाठबळ मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.










