डिजीटल इंडियात केबल मोफत मिळत असेल तर पेट्रोल डिझेल दूध फुकट द्या

डिजीटल इंडियात केबल मोफत मिळत असेल तर पेट्रोल डिझेल दूध फुकट द्या

उध्दव ठाकरेंचा टोला

मुंबई : डिजीटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत असल्याने केबलही फुकट देण्याच्या घोषणा केली जात आहे. मात्र, त्यामुळे केबल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात अाहे. केबल मोफत द्यायचे असेल तर मग पेट्रोल,डिझेल ,दूध,भाज्या सगळेच फुकट द्या असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.

रंगशारदा सभागृहात आज केबल सेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.रिलायन्स जिओ मुळे केबल व्यवसायिकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.त्याबाबत या मेळाव्यात माहिती देण्यात आली.या मेळाव्यात उपस्थित मोठ्या संख्येतील केबल व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना उध्दव ठाकरे म्हणाले ‘मी आज केबलवाल्यांना बळ द्यायला आलो आहे,तुमच्याकडे कमी बळ नाही.या लढाईत शिवसेना तुमच्या सोबत आहे. रिलायन्स जिओ विरोधात आक्रमक झालेल्या केबल मालक संघटनांनी काही नुकतीच उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती.

सगळे फुकट देणे हे केवळ घोषणे पुरत असते. आधी फुकट देऊन लोकांना आपल्याकडे वळवायचे नंतर शुल्क आकारणी करायची. त्यामुळे सगळ्यांना आनंदात रहायचे असेल तर केबल चालकांचा पोटावर पाय देऊ नका त्यांना पुढे घेऊन जा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.३० वर्ष राबून तुम्ही व्यवसाय उभा केला आहे. तुमचा व्यवसाय मी जाऊन देणार नाही असा दिलासा त्यांनी आपल्या भाषणात दिला.मागच्या वेळेस सेट टॉप बॉक्स आले होते तेव्हा ही भाजपचे सरकार होते .मात्र बाळासाहेब ठाकरे हे केबल चालकांच्या च्या मागे होते.डिजिटल इंडियात जर फुकट मिळत असेल तर मोदींनी त्यांच्यांकडून शिकले पाहिजे असे सांगत सर्व फुकट देणार असेल तर ही लालूच दिली जातेय असा टोला लगावला.

केबल चालकाच्या व्यवसायाला कुठलाच धक्का पोहोचु देणार नाही असे आश्वासन देतानाच ,देशात सध्या सगळीकडे डिजिटलचा नारा दिला जात आहे पण रोजी रोटी डाउनलोड करता येत नाही. घरात रोजी रोटी नाही आणि डिजिटल इंडिया कसला करताय असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.

Previous articleदेहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी २१२ कोटी आणि सेवाग्राम विकासासाठी १७ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर
Next articleमाळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर देखील पोहचावे