दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका

दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका

उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

मुंबई : घरपोच ऑनलाईन दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा राज्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा असे राज्य सरकारला ठणकावत दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवी आहे असा टोला  त्यांनी सरकारला लगावला आहे.

ऑनलाईन दारू विक्री करण्यासंदर्भात विरोधीपक्षांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली असता असा निर्णय घेतलाच नसल्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले आहे.ऑनलाईन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही, पण राज्याची शोभा करण्याचा प्रयोग रोजच सुरू असल्याचे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्री राज्यात फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवी आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Previous articleसरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहासोबत बैठक सुरू