मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहासोबत बैठक सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहासोबत बैठक सुरू

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.या दोन नेत्यामध्ये महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात झाली आहे.या भेटीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील मिळू शकतो.

दस-यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज बुलढाणा दौ-यावर होते.  या दौ-यांनतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतीला लिला हॅाटेलमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केली जावू शकते. आगामी लोकसभा निवडणूकीत नाराज शिवसेनेला जवळ करण्यासाठी शिवसेनेला अधिक महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मंत्रिमंडळाच्या  फेरबदलासाठी या बैठकीत चर्चा होवून यादी निश्चित केली जावू शकते.या बैठकीतच मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा हे मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदील देवू शकतात अशी चर्चा आहे. दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जातील असे सूत्रांकडून समजते.

Previous articleदुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका
Next articleडेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ