डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

शाळा, महाविद्यालये, रात्रशाळा यामध्येही वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते वाहतूक पोलीसांनाही पुस्तकाची भेट

मुंबई :  माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रभावी लिखाणाणे देशाच्या युवा पिढीला एक नवीन विचार दिला. भारताची युवा पिढी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींच्या लिखाणामुळे अधिक ज्ञानवंत झाली. कलाम यांची प्रेरणा घेऊन या वाचन प्रेरणा दिनापासून प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट, मोबाईल चे सर्व इलेक्ट्रानिक गॅझेट बाजूला ठेवून काही तास वाचन करावे, हिच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देशावासिंयाकडून खरी आदरांजली ठरेल, असे मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी आज सांगितले.

विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या फिरत्या ग्रंथालयाचा शुभांरभ आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेस या दोन गाड्यांमध्ये शानदारपणे झाला. सर्वप्रथम मुंबई ते पुणे या डेक्कन क्वीनमध्ये आणि नंतर मुंबई ते नाशिक या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा प्रारंभ झाला. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर निशुल्कपणे उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देणार आहेत. या ट्रॉलीचे उद्घाटनही मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. जैन उपस्थित होते. यावेळी  तावडे यांनी डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना प्रवासात वाचनासाठी पुस्तके दिली.

याप्रसंगी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना  तावडे म्हणाले की ट्रेनमधील वाचनदूत हे तेथील प्रवाशांना भेटून पुस्तक देणार आणि मुंबईहून निघाल्यानंतर पुणेमध्ये गाडीमधून उतरताना पुन्हा जमा करणार. पुन्हा दुसऱ्यादिवशी याचपध्दतीने पुस्तक घेऊन वाचायचे आणि पुन्हा पुस्तक जमा करायचे असा हा उपक्रम आहे. दर दोन-तीन महिन्यानंतर पुस्तके बदलत जातील, त्यामुळे प्रवास तर चांगला होईल, वाचन करत होईल, असा हा प्रयोग डेक्कन क्वीन आणि पंचवटीमध्ये मुंबई-नाशिक, नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे, पुणे-मुंबई करीता हा उपक्रम सुरु करत असल्याचे मराठी भाषा मंत्री  तावडे यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्री पिेयुष गोयल यांचे मी मनापासून आभार मानतो की, हा उपक्रम सुरु करण्यासाठी त्यांनी खुप मदत केली आणि मराठी भाषा विभाग व मध्य रेल्वे मिळून हा उपक्रम यशस्वी केला, असा विश्वास  तावडे यांनी व्यक्त केला.

आपल्याकडे मराठी, इंग्रजीमध्ये भरपूर पुस्तके आहेत, साहित्य आहेत आणि ज्याला जे वाचायचे आहे, त्याला तशी पुस्तके उपलब्ध करुन देणे हे सरकारला सहज शक्य आहे. कारण ही पुस्तके वाचून परत घेणार आहे. आपण १२ हजार वाचनालयाला पुस्तके देत असतो, त्यामध्ये ही दोन वाचनालये वाढलेली आहेत. पण चांगली दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करेल, असे  तावडे यांनी यावेळी सांगितले.

डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य गुरुकुल शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनघा संतोष सोनावणे या विद्यार्थीनीचा  विनोद तावडे व आशिष शेलार यांच्याहस्ते पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरात अनघाने तब्बल १२० पुस्तकांचे वाचन केले आहे. गेल्यावर्षीच्या वाचन प्रेरणा दिनापासून अनघाने वाचनाला प्रारंभ केला. याप्रसंगी अनघाचे आई-वडील उपस्थित हेाते.

१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस राज्य सरकारच्यावतीने आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी गिरगाव चौपाटी येथील ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस आणि पोलिसांना पुस्तकाचे वाटप केले. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियमन केल्यानंतर वाचनासाठी थोडा वेळ काढून आवश्य पुस्तक वाचन करा, असा संदेश  तावडे यांनी पोलीसांना यावेळी दिला. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर चर्चगेट येथील ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीसांना आणि पोलीसांना तावडे यांनी पुस्तक भेट दिली. त्यानंतर मंत्रालयात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली व्यक्त केली. मंत्रालयात त्रिमुर्ती प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या वाचन कट्टा येथे मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी भेट दिली.  तावडे यांनी स्वत: त्रिमुर्ती प्रांगण येथे तयार करण्यात आलेल्या वाचन कट्टा येथे बसून काहीवेळ पुस्तकांचे वाचन केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी एस.एल. ॲण्ड एस.एस. गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. यावेळी  तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींशी गप्पा मारल्या. याप्रसंगी आर्यन हायस्कूल, शारदा सदन, सॅबेस्टाईन हायस्कूल, बीजेपीसी स्कूल चे विद्यार्थी सुध्दा उपस्थित होते. यावेळी  तावडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान आवश्यक आहेच परंतु पुस्तकी ज्ञानाबरोबर अवांतर वाचनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तितकेच आहे. विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टीने वाचनाचा फायदा होऊ शकतो. गोष्टीचे पुस्तक, कथा , कांदबरी यांचे वाचन विद्यार्थ्यांना करावे असे आवाहन श्री.तावडे यांनी केले. त्यामुळे आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यांनी येत्या वर्षभरात किमान १० पुस्तके वाचण्याची प्रतिज्ञा घ्या असेही  तावडे यांनी विदयार्थ्यांना सांगितले. यावेळी श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. यावेळी शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.

डोंगरी येथील डोंगरी महापालिका शाळेमध्ये मॉडेल नाईट हायस्कूल येथे शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रात्रशाळेत शिक्षण घेणारे अनेकजण उपस्थित होते.

Previous articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहासोबत बैठक सुरू
Next articleशिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार २ लाख ५० हजार घरकुलांचे ई-गृहप्रवेश