औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याची नावे बदला

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याची नावे बदला

मुंबई : आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामकरण करण्यासाठी विलंब का लागतो आहे असा सवाल मुख्यमंत्र्यांना केल्याचे सुभाष देसाई याना सांगीतले.

नुकतेच अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे करण्यात आले त्यानंतर फैजाबादचे नाव बदलून ते अयोध्या करण्यात आले. एका रात्रीत जर या शहरांची नावे बदलतात तर 1995 ला युतीचे सरकार असताना जर औरंगाबादचे नामकरण करण्याचा प्रस्ताव तयार होउन केंद्राकडे गेला होता तर अजुन हे नामांतर का होत नाही असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला,मुख्यमंत्र्यांनी या नामांतराबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे देसाई यांनी सांगितले.

Previous articleमराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून चालढकल : अजित पवार
Next articleयेत्या निवडणूकीत महाराष्ट्र युती सरकारची शिकार करेल : राज ठाकरे