आरक्षणाच्या मागणीसाठी आ. प्रकाश गजभिये महाराजांच्या वेषात !

आरक्षणाच्या मागणीसाठी आ. प्रकाश गजभिये महाराजांच्या वेषात !

 मुंबई : मराठा ,धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी  आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलने करत असतात. याअगोदर त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित आरोपी संभाजी भिडे यांचा वेष परिधान करुन त्यांच्या मुल होणाऱ्या आंब्याची विक्री करत लक्ष वेधले होते.त्यानंतर त्यांनी संत तुकारामांचा वेष परिधान करुन आंदोलनामध्ये धार आणली होती आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण आणि इतर विषयासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन ‘देताय की जाताय’ असं म्हणत सरकारचे लक्ष वेधले. 

 मराठा धनगर मुस्लिम या समाजाला तात्काळ आरक्षण दया शिवाय जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी कधी देणार आणि छत्रपती व बाबासाहेबांचे स्मारक कधी बांधणार असे प्रश्न उपस्थित करत आमदार प्रकाश गजभिये यांनी सरकारला ही आश्वासने पूर्ण करता येत नसतील किंवा देता येत नसतील तर २०१९ मध्ये चालते व्हा असा इशाराही आमदार  गजभिये यांनी दिला.

Previous articleबेपत्ता मुलींचा शोध न घेतल्यास ‘तुम्हाला’ बेपत्ता करू : शालिनी ठाकरे
Next articleगली-गली में शोर है…विरोधकांची घोषणाबाजी