सरकार देणार प्रत्येकाला १५ लाख : रामदास आठवले

सरकार देणार प्रत्येकाला १५ लाख : रामदास आठवले

सोलापूर: केंद्र सरकार प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रूपये टाकणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. तसेच जीएसटीलकमी तरणे, पेट्रोलचा भाव आणि महागाई कमी करण्यासाठीही सरकार प्रयत्न करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

शिष्यवृत्तीत वाढ करण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.तीन राज्यांतील पराभवाबद्दल आठवले म्हणाले की, राजस्थानमध्ये पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपराच आहे. तर मध्यप्रदेशात भाजपची १५ वर्षे सत्ता होती. तीन राज्यांतील कॉंग्रेसचा विजय राहुल गांधी यांचा नाही आणि पंतप्रधान मोदींचा पराभवही नाही. राफेल प्रकरणी कॉंग्रेस खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायालयानेही सरकारला क्लीन चिट दिली आहे. २०१९ मध्येही मोदींचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तामिळनाडूतील द्रमुकचे स्टॅलिन म्हणतात की, राहुल गांधी पंतप्रधान होतील. पण महाआघाडीत पंतप्रधानपदावर एकमत होणार नाही. आणखी दहा वर्षे मोदी पंतप्रधान राहतील, असेही आठवले म्हणाले.

२०१४ च्या निवडणुकीतही भाजपने लोकांना प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रूपये जमा केले जातील, असे सांगितले होते. तसे काहीही नघडल्यामुळे भाजपवर आजही जोरदार टीका केली जाते. आठवले यांनी पुन्हा त्याचा पुनरूच्चार केल्यामुळे विरोधक आठवलेंसह भाजपला घेरण्याची शक्यता आहे.

Previous articleशिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा पुन्हा घाट
Next articleजनता आता भाजपला घरी बसवेल : पृथ्वीराज चव्हाण