स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूखंड भाडेकराराचे नोंदणी व मुद्रांक शुल्क माफ

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूखंड भाडेकराराचे नोंदणी व मुद्रांक शुल्क माफ

मुबई : बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या मालकीच्या महापौर बंगल्याच्या जागेवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संस्थेला या जागेचे भाडेपट्ट्याने हस्तांतरणासाठी द्यावे लागणारे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी नोंदणी अध‍िन‍ियम-१८६० नुसार बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेला स्मारकाच्या उभारणीसाठी बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेकडून महापौर बंगल्याची जागा ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. त्यानुसार होणाऱ्या भाडेकराराच्या दस्तासाठी महाराष्ट्र मुद्रांक अध‍िन‍ियमानुसार १४ कोटी ४१ लाख ६१ हजार ५० रुपये इतके मुद्रांक शुल्क तर नोंदणी अध‍िन‍ियम-१९०८ नुसार ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. या प्रकल्पाचे महत्त्व आण‍ि लोकहित लक्षात घेऊन भाडेकराराच्या दस्ताचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली.

Previous articleप्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली तरच महाआघाडीत स्थान
Next articleनारायण राणेंची शेवटची फडफड सुरू : रामदास कदम